आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Minister Vinod Tavade Comment On English School

मागेल त्याला इंग्रजी शाळा नाहीच, विनोद तावडे यांची विधानसभेत परखड भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अलीकडच्या काही वर्षांत राज्यात इंग्रजी शाळांचे पीक आले आहे. यातून नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मागेल त्याला इंग्रजी शाळा' देण्याचे धोरण सरकार स्वीकारणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले.

राज्यात विनापरवाना २ हजारांहून अधिक इंग्रजी शाळा सुरू आहेत. या शाळांना ठरावीक मुदतीमध्ये मान्यता देणार का, असा प्रश्न दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना तावडे बोलत होते. वळसे-पाटील म्हणाले, की ‘अनुदानाची अपेक्षा न ठेवता, अनेक इंग्रजी शाळा पुढे येत आहेत. या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने त्यांना मान्यता देण्याची गरज आहे.’ त्यावर तावडे म्हणाले, की शाळा सुरू करताना अनेक संस्थाचालक १०० रुपयांच्या बाँडवर आम्ही कधीही अनुदान मागणार नसल्याचे लिहून देतात. काही वर्षांनी मात्र या शाळांकडून अनुदानाची मागणी होते. या पार्श्वभूमीवर मागेल त्याला शाळा देता येणार नाही. मात्र, आवश्यक त्या ठिकाणी शाळा दिली जाईल.’

ग्रामीण भागात उर्दू शाळा
उर्दू शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न या वेळी उपस्थित झाला. उर्दू शिक्षक भरतीसाठी 'टीईटी' आवश्यक नसल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. मात्र, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी किमान पात्रतेचे शिक्षक विद्यार्थ्यांना मिळायला हवेत, या उद्देशाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार अाहाेत, असे तावडे म्हणाले. ग्रामीण भागातील उर्दू माध्यमिक शाळांची गरज असणारी ठिकाणे निश्चित केली असून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत, असेही त्यांनी सांगितले.