आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education News In Marathi, MBBS, Medical Entrance, Divya Marathi

एमबीबीएसच्या राज्यातील 285 जागा गोठवल्या, सुविधा नसल्याने 4 महाविद्यालयांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने राज्यातील 4 महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या 285 जागांच्या प्रवेशाचे 2014-15 वर्षासाठीचे नूतनीकरण नाकारण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेशांतील स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.
देशातील 45 महाविद्यालयांतील 3 हजार 820 जागांना सोयी-सुविधेअभावी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक 8 महाविद्यालये कर्नाटकातील, तर मध्य प्रदेशातील 3, आंध्र व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 6 महाविद्यालयांचा समावेश आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने (एमसीआय) तपासणी केल्यानंतर वर्ष 2014-15 साठी 118 वैद्यकीय महाविद्यालयांतील 8 हजार 567 एमबीबीएसच्या जागा नामंजूर करण्याची शिफारस केली होती.
मात्र, संबंधित महाविद्यालयांनी उणिवांची पूर्तता केल्याचे अहवाल केंद्र सरकारने परिषदेकडे पाठवले होते.परिषदेने 8 व 12 जुलै रोजी या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना महाविद्यालयांनी सुविधा पुरवल्याची खात्री पटली. त्यामुळे कारवाई केलेल्या 73 प्रकरणांतील 4,747 जागांना परवानगी देण्याची शिफारस त्यांनी केली. मात्र, उर्वरित पदांना परवानगी देऊ नये, असेही परिषदेने ठणकावले आहे.

राज्यात 20 शासकीय, तर 23 खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालयांमध्ये 2 हजार 60 तर खासगी महाविद्यालयांत 450 जागा आहेत. 8 मे रोजी सुमारे 1 लाख 48 हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सामायिक पात्रता (नीट) परीक्षा दिली होती. त्यातील 4,111 खुल्या तर 3,395 आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.

जागा वाढवण्याची शिफारस
16 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करावीत व त्यात 2 हजार 50 एमबीबीएसच्या जागा असाव्यात. देशातील वैद्यकीयच्या विद्यमान 10 महाविद्यालयांतील 600 जागा चालू वर्षात वाढवण्याची शिफारसही वैद्यकीय परिषदेने केली आहे.