आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Of Children Of Farmers, Will Service Indira Institute Pune

शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, नाेकरी देणार, पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूटचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुष्काळ अवर्षणामुळे राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अार्थिक अडचणीमुळे या शेतकऱ्यांची पुढची पिढी शिक्षण नोकरीपासून वंचित राहू नये, यासाठी पुण्यातील इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला अाहे.
मराठवाडा विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण नोकरी देण्याची जबाबदारी अाम्ही स्वीकारत असल्याची घाेषणा या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. तरीता शंकर यांनी शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात केली.

पुणे जिल्ह्यातील या संस्थेतर्फे अायाेजित ‘इंदिरा शाश्वत महाराष्ट्र पुढाकार’ या कार्यक्रमात त्यांनी ही घाेषणा केली. संस्थेचे समूह संचालक प्रा. चेतन वाकलकर, प्राचार्य सुभदिप राह, डॉ. जनार्दन पवार, डॉ. एस बी इंगोले यांच्यासह संस्थेचे अाजी- माजी विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शंकर म्हणाल्या कि, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या मदतीसाठी इंदिरा शाश्वत महाराष्ट्र पुढाकार या नावाने उपक्रम राबविले जाणार अाहेत.’प्रा. वाकलकर म्हणाले की, ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका मुलाची उच्च शिक्षणाची नोकरीची जबाबदारी घेतली जाईल. तसेच इंदिरा कँपस येथे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रम प्रायोजित करून या मुलांना मदत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारण्यासाठी मदत हाेणार अाहे. तसेच या मुलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या इन्स्टिटयुटने मराठवाडा आणि विदर्भ या भागात सर्वेक्षण केले आहे.
तेथील शेतकऱ्यांशी याबाबत व्यापक चर्चा करून समस्यांवर पर्यायी उपाययोजना करण्यासाठी प्रकल्प आखणी केली आहे. या प्रकल्पात इतर एनजीओंना सहभागी करुन या भागातील शेतकऱ्यांचे समुपदेशन मार्गदर्शन करण्यात येणार आहे,’ अशी माहितीही प्रा. वाकलकर यांनी दिली.