आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतनेतर अनुदानासाठी संस्थाचालकांचा महामोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केजी टू पीजीपर्यंत शिक्षण मोफत मिळावे आणि शिक्षण संस्थांचे प्रलंबित वेतनेतर अनुदान तत्काळ देण्यात यावे, या मागण्यांसाठी राज्यातील हजारो शिक्षण संस्थाचालकांनी मुंबईत शनिवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडून शिक्षण संस्थांना देण्यात येणारे वेतनेतर अनुदान मिळालेले नाही. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क येथून नर्दुल्ला टँक मैदानावर मोर्चा काढण्यात आला. राज्यातील हजारो शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या मोर्चामध्ये सामील झाले होते.

या वेळी कपिल पाटील म्हणाले, संस्थांचे वेतनेतर अनुदान प्रलंबित राहिल्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील सुविधांची आबाळ होत आहे. वेतनेतर अनुदान मिळणे हा शिक्षण संस्थांचा हक्क असून शासनाने 1 एप्रिलपर्यंत अनुदानाचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला.'