आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखू बंदीचे फलक लावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी परिसरात तंबाखू बंदीचे बोर्ड लावण्याचे निर्देश द्यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. संस्थेच्या 100 मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवन यावर बंदी असल्याचा मजकूर या फलकावर असावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शाह आणि न्यायमूर्ती एम.एस.संकलेचा यांनी अ‍ॅडव्होकेट दिनार सोहोनी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीप्रसंगी हे निर्देश दिले आहेत. कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ बंदीच्या कायद्याचे पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. शैक्षणिक संस्थांनी इमारतींबाहेर अशा प्रकारचे फलक लावणे या कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यासंदर्भात याचिकाकर्त्यांना मुंबई विद्यापीठासह काही शैक्षणिक संस्थांना पत्रे लिहिली होती. पण त्यावर काहीही प्रतिक्रिया मिळाली नसल्याचे सोहोनी यांनी म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्याच्या शिक्षण विभागाला सर्व शैक्षणिक संस्थांना निर्देश देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.