आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eduction Minister Order On School Teacher Tobacco Eating Issue

शिक्षकांनो शाळेत तंबाखू मळाल तर बाहेरचा रस्ता; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शाळेच्या आवारात तंबाखू, दारूचे व्यसन करणाऱ्या शिक्षकांना बडतर्फ करणार असल्याची महत्वाची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. व्यसनी िशक्षकांना यापुढे दयामाया दाखवणार नसल्याचेही त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

व्यसनी शिक्षकांना प्रमोशन, पुरस्कार तसेच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा बंद करण्यात येतील. अाधी समजावून सांगण्यात येईल, मात्र त्यानंतरही जे शिक्षक िनयमाचे पालन करणार नाहीत त्यांना बडतर्फ केले जाईल, असेही तावडेंनी सांिगतले

िवद्यार्थी िशक्षकांकडे आदर्श म्हणून पाहत असतात. आपले आदर्शच जर शाळेच्या अावारात िबनधास्त व्यसने करत असतील तर िवद्यार्थ्यांची पावले चुकीच्या मार्गावर पडण्याची शक्यता अाहे. यात दाेष कोणाचा? असा सवाल उपस्थित होत असल्याने सरकारने हा कठाेर िनर्णय घेतला असल्याचे तावडे म्हणाले.

संिमश्र प्रतिक्रिया
अशा कारणांमुळे बडतर्फीची िशक्षा होणार असेल तर त्याविरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा िशक्षकांच्या संघटनांनी िदला आहे. मात्र, बहुतांशी महिला िशक्षकांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले अाहे.