आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राज\' पुत्राच्या आजाराचे मनसेच्या प्रचारावर सावट (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महापालिका निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचारात उतरले आहेत. साहजिकच प्रचाराला इतक्या विलंबाने सुरुवात करण्याचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला. मुंबईच्या पहिल्या सभेत  खुद्द राज ठाकरेंनीच आपला मुलगा अमितच्या आजारामुळे प्रचार सुरू करण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बुधवारी दिवसभर अमितच्या आजारपणाबाबत उलटसुलट चर्चांना ऊत आला होता. मात्र या सर्व अफवा असून अमितची तब्येत उत्तम असल्याची माहिती  ठाकरेंच्या निकटवर्तीयांनी दिली.

आठ दिवसांपूर्वीच अमित ठाकरेने आपले अधिकृत फेसबुक पेज सुरू करत प्रचारात सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमितच्या मानेजवळ गाठ आढळून आल्याने त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस उपचार आटोपून सध्या अमित घरी परतला आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, अमितच्या आजाराचे नेमके निदान अद्याप झाले नसून अगोदर त्याला न्यूयॉर्क शहरातील स्लोआन केटरिंग रुग्णालयात दाखल करण्याचा विचार सुरू होता. मात्र आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्सचा सल्ला घेतला जाणार असल्याचे समजते. मात्र अमितची तब्येत उत्तम असल्याची माहिती ठाकरे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.   
  
‘बाबा, तुम्ही प्रचाराला जा’   
अमितच्या आजारपणामुळे राज ठाकरे यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहण्याचा विचार करत होते. महापालिका प्रचाराची धुरा आपल्या पहिल्या फळीतील नेत्यांवर सोपवण्याच्या विचारात असतानाच खुद्द अमितनेच राज यांना “बाबा, तुम्ही प्रचाराला जा’ असा प्रेमळ सल्ला दिल्याचे समजते. तसेच अमितच्या ब्रीच कँडी येथील उपचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही रुग्णालयात जाऊन अमित याच्या तब्येतीची विचारपूस केल्याचे कळते. 
बातम्या आणखी आहेत...