आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eggs Hurled At Accused; Confusion On \'minor\' Suspect

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई बलात्‍कारः आरोपींवर न्‍यायालयाबाहेर अंडाफेक, एका आरोपीच्‍या वयावरुन संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील तिघा नराधमांवर आज (शुक्रवार) किल्‍ला कोर्टाच्या आवारात संतप्त महिलानी अंडी आणि टमाटर फेकून मारले. गेल्या गुरूवारी या आरोपींनी छायाचित्रकार तरूणीवर सामुहिक बलात्‍कार केला होता. सर्व आरोपींना अटक करण्‍यात आली. त्‍यापैकी सिराज खान, विजय जाधव आणि कासिम बंगाली यांची पोलिस कोठडी संपल्‍यामुळे त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले होते. त्‍यावेळी हा प्रकार घडला. दरम्‍यान, एका आरोपीच्‍या वयावरुन संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्‍याच्‍या आईने तो अल्‍पवयीन असल्‍याचा दावा केला आहे. तर, कासिम बंगालीचा अल्‍पवयीन असल्‍याचा दावा न्‍यायालयाने फेटाळला आहे.

तिन्‍ही आरोपींनी न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. त्‍यावेळी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांनी त्‍यांच्‍यावर सडलेले टमाटर आणि अंडे फेकले. तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आरोपींचे काही कपडे अद्याप ताब्‍यात घेतलेले नाही. तपासासाठी हे आवश्‍यक असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. त्‍यानंतर पोलिस कोठडीत वाढ करण्‍यात आली.

कासिम बंगालीचा अल्‍पवयीन असल्‍याचा दावा फेटाळला.... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..