आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eight Arrested To Mumbai University Paper Leak Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई विद्यापीठ पेपर फुटी प्रकरणी आठ अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने धरपकड सुरू केली असून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात विद्यापीठातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मुंबई विद्यापीठाचा टी.वाय.बी कॉम आणि इंजिनीअरिंगचा पेपर फुटला होता. या पेपरफुटीमुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला होता. याप्रकरणी कुलकुरु राजन वेळूकर यांनी सुरुवातीला हात झटकले होते. मात्र नंतर त्यांनीही पेपर फुटीचे मान्य केले होते.
पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रा.मधु परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पेपरफुटीतील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध पोलिस आणि चौकशी समिती घेत आहे.

पेपरफुटी प्रकरणी कुलगुरूंचे पोलिस आयुक्तांना साकडे
पेपरफुटी प्रकरण : बड्या अधिका-यांची झाडाझडती