आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Killed In Cylinder Blast At Mumbai Hotel; 5 Students Missing

हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट, आठ जण ठार, मुंबईच्या कुर्ल्यातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुर्ला येथील हॉटेल सिटी किनारामध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही भीषण घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुर्ला येथील कमानी परिसरात सिटी किनारा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये चायनीज फास्ट फूड मिळते. रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू असते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी या ठिकाणी तुलनेने गर्दी कमी होती. दुपारच्यावेळी हॉटेलमधील किचनमधील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यात आठ जण जागीच ठार झाले. मृतांत काही हॉटेल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मृतांची अद्याप ओळख पटू शकली नाही. घटनेनंनतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग काही वेळात आटोक्यात आणली. दरम्यान, शार्टसर्किटमुळे ही आग लागून नंतर सिलिंडरचा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर पाहा हॉटेल सिटी किनाराचे फोटो...