आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न कधी करायचे ते सलमाननेच ठरवावे : कॅटरिना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यश चोप्रा यांची निर्मिती असलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रमोशनला ‘एक था’ ची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी कॅटने पत्रकारांशी बोलताना सांगितले, सलमानने लग्न कधी करावे हा त्याचा खासगी प्रश्न आहे. त्यामुळे तो योग्य वेळी लग्न करेल असे सांगून कॅटने त्यांच्यातील संबंध तुटल्याची जाण सर्वांना करून दिली.
सध्या ‘एक था टायगर’चे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. या चित्रपटाच्या प्रोमोवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा विषय सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे सलमान चांगलाच नाराज झाला आहे. तसेच तो यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. गुरुवारी झालेल्या प्रमोशनमध्ये पत्रकारांनी कॅटरिनाला सलमानबाबत विचारले असता, कॅट म्हणाली सलमानला वयाच्या कितव्या वर्षी लग्न करायचे हे त्याने ठरवावे. तसेच हा त्याचा खासगी प्रश्न असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये बिनसल्याचे सध्या तरी दिसत आहे. बॉलीवूडमध्ये या दोघांच्या प्रेमाची चर्चा आजही तेवढ्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून हे दोघे वेगळे झाले आहेत.
कॅटरिनाला बॉलीवूडमध्ये स्टार करण्यात सलमान खानचा मोठा हातभार आहे, हे सर्वश्रुत आहे. या दोघांमध्ये जवळीक वाढली त्यानंतर कॅट आणि सलमानचे प्रेमसंबंध फुलले.तसेच या दोघांनी काही चित्रपटात एकत्र कामदेखील केले आहे. मात्र, सलमानच्या सणकी स्वभावाचा कॅटला अनेकदा फटका बसला आहे. याच कारणामुळे कॅटरिनाने त्याच्यासोबत संबंध तोडल्याचे बॉलीवूडमध्ये बोलले जाते.
कॅटरिनाच्या प्रेमात कोणीही पडेल : सलमान
सलमान आणि कॅटरिना सध्या जरी वेगळे झाले असले तरी सलमानचे तिच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नसल्याची प्रचिती येते. याचे उदाहरण म्हणजे याच कार्यक्रमात कॅटच्या प्रेमात कोणीही सहज पडू शकते असे सलमानने सांगितले. तसेच तिच्यावर प्रेम करणारे करोडो फॅन्स आहेत. त्यामुळे तिच्यासोबत पडद्यावर आणि ख-या आयुष्यात प्रेम करायला निश्चित आवडेल असे सलमानने सांगितले. त्यामुळे सलमानच्या मनात आजही कॅटरिनासाठी जागा असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.