आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eknath Khadse First Said Shut Down, Then U Turn On Fodder Camp

चारा छावणीने केली नाथाभाऊंची चांगलीच दमछाक, पंकजांची शिष्टाई मराठवाड्याच्या पथ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांत रब्बी हंगामात मुबलक चारा आहे. शेतकरी छावण्यांतील जनावरे परत नेत आहेत. मग छावण्या चालू ठेवून जनतेचा पैसा वाया घालवायचा का?’ असा सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे मंगळवारी दुपारपर्यंत उपस्थित करत होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘संदेश’ येताच याच खडसेंनी तातडीने घूमजाव केले. या तिन्ही जिल्ह्यांतील छावण्या अद्याप बंद केल्या नाहीत, त्या गरजेनुसार पुढे चालूच राहतील, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

खडसे यांच्या रामटेक बंगल्यावर सोमवारी सकाळपासून ‘छावणी एके छावणी’ विषय सुरू होता. महसूल विभागाचे सचिव, उपसचिव, पीएस साहेबांच्या टेबलासमोर ठाण मांडून होते. बीड, लातूर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी खडसे यांना सतत अपडेट करत होते. एकंदर भाऊ (खडसे) छावणीच्या बैठकीत व्यग्र होते. त्यामुळे भेटावयास आलेल्यांची गर्दी अगदी पोर्चबाहेर गेली होती.

लाॅबीत ताटकळत असणाऱ्यांमध्ये जसे सामान्य नागरिक, आमदार हाेतेे तसे सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयकुमार देशमुखसुद्धा होते. बराच वेळ गेल्यानंतर भाऊंनी पत्रकारांना बोलावले. ‘लातूर, उस्मानाबाद अाणि बीड या तिन्ही जिल्ह्यांत सध्या चारा मुबलक उपलब्ध आहे. छावण्यांतून मागच्या आठवड्यात १२०० तर चालू आठवड्यात ९६७ जनावरे शेतकऱ्यांनी परत नेली अाहेत. त्यामुळे तूर्तास छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला अाहे,’ अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या अात्महत्यांचे सत्र चालू असताना छावण्या बंद करण्याचा निर्णय का घेतला, यावर छावण्यांचा अाणि आत्महत्यांचा काही संबंध नाही. शेतकऱ्यांना छावण्यांची गरज वाटत नाही, मग काय पैसे खाण्यासाठी छावण्या चालू ठेवायच्या काय, असा प्रतिप्रश्नही त्यांनी पत्रकारांना विचारला.

मात्र सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी ‘मंत्रिमंडळ उपसमितीने निर्णयाचा फेरविचार करावा’ असा बाइट दिला तेव्हा खडसेंचा नूर बदलला. तत्पूर्वी ‘नाथाभाऊ नाथाभाऊ अाहे, उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीही रण माजणार नाही’, असे म्हणणाऱ्या खडसेंनी या तिन्ही जिल्ह्यांतील चारा छावण्या अद्याप बंद केल्या नसून त्या यापुढेही चालूच राहतील,’ असे सांगितले.
पुढे वाचा.. अात्ताच चारा छावण्या बंद करणे अयोग्यच - उध्‍दव ठाकरे