आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांनी जबाबदारी झटकू नये : खडसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याची शरद पवारांची खंत वस्तुस्थितीला धरूनच आहे. मात्र, याबाबतचे जाहीर वक्तव्य करण्यापूर्वी सत्तेत सहभागी असलेल्या पवारांनी आपल्या मंत्र्यांना जाब विचारायला हवा होता, पवारांनी असे वक्तव्य करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ते बुधवारी मुंबईत दै. ‘दिव्य मराठी’शी बोलत होते.
राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याबाबत शरद पवारांनी जाहीररीत्या केलेल्या वक्तव्याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे सांगून राज्यात उद्योगांमध्ये गुंतवणूक होण्यासाठी महत्वाच्या गोष्टी असतात त्या वीज, पाणी, जमीन आणि करसवलती यापैकी महत्वाची खाती ही सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीकडेच आहेत, त्यामुळे पवारांनी नाराजी कशी व्यक्त केली याबाबत कोडेच असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. एकीकडे मंत्रीमंडळात सहभागी व्हायचे आणि दुसरीकडे टीकाही करायची हा दुटप्पीपणा पवार करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. उद्योग राज्याबाहेर जाणे ही मंत्रीमंडळाची सामुहिक जबाबदारी आहे त्यासाठी केवळ बाबा आणि दादा यांनाच नव्हे तर संबधित खात्यांच्या मंत्र्यांनाही जबाबदार धरण्यात यावे असे सांगून राष्ट्रवादीकडे असलेल्या वित्त आणि नियोजन विभागामुळेच राज्याचे उद्योग धोरण अद्याप जाहीर होऊ शकलेले नाही,असा आरोपही खडसे यांनी केला.
तटकरेंच्या चौकशीसाठी समिती नेमावी
राज्याच्या मंत्रीमंडळातील एखाद्या मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असतील तर त्याची दखल सरकारने घेतलीच पाहिजे असे सांगून जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली जावी असे मत खडसे यांनी व्यक्त केले आहे. तटकरे यांच्या कुटूंबियांवर जमीन खरेदी आणि कंपन्या स्थापन करण्याचे आरोप आहेत. थेट तटकरेंचा यात सहभाग नसल्याने त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्न येत नाही, मात्र त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केलेल्या जमीनींचे व्यवहार आणि स्थापन केलेल्या कंपन्या या अधिकृत आहेत किंवा नाहीत तसेच या व्यवहारांमध्ये तटकरेंनी मंत्रीपदाचा गैरवापर केला हे पाहावे.
तटकरे साहेबांच्या \'कार्पोरेट कर्तृत्त्वा\'ने महाराष्ट्र सुन्न
मुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यालयात अडकले राज्‍याचे उद्योग धोरण
धोरण नसल्याने उद्योग राज्याबाहेर, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका