आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यातील मंत्र्यांना खातेवाटप करतानाही सरकारने दुजाभाव दाखवल्याबद्दल खडसे यांनी नर्मविनोदी शैलीत खिल्ली उडवली. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आपल्याकडे महत्त्वाची खाती ठेवून उर्वरित महाराष्ट्राला मात्र कमी महत्त्वाची खाती दिल्याचे ते म्हणाले. विदर्भातील नितीन राऊत यांच्याकडील रोहयो खात्याचे ‘अर्धे तुम्ही अर्धे आम्ही’ असे वर्णन त्यांनी केले. संजय देवतळे यांच्याकडे सांस्कृतिक, पर्यटन खाते म्हणजे ‘नाचा, गाणी म्हणा आणि लावण्यांना जा’. मनोहर नाईकांकडील अन्न व औषध प्रशासन खात्याकडे बोट दाखवत खडसे म्हणाले की, ‘अन्न, भेसळ, मिसळ आणि सभागृहातून गायब’.
खान्देशातील मंत्री पद्माकर वळवी यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘बजरंग बली’सारखे आहे. त्यांची ताकद जास्त असताना त्यांना खाते काय तर क्रीडा.. असे म्हणत खडसेंनी सभागृहामध्ये हशा पिकवला. तसेच राजेंद्र दर्डा यांना ‘बालशिक्षण, चला शाळेत जाऊया’ तर विजयकुमार गावीत यांना फलोद्यान म्हणजे ‘आम्ही फळे लावतो, तुम्ही फळे खा’ अशी बिनमहत्त्वाची खाती दिल्याचे ते म्हणाले. त्याच वेळी सिंचन, वित्त, कृषी, सहकार अशी महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे घेतली असून मुख्यमंत्रिपदही त्यांच्याकडेच असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.