आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंवर गुन्हा नाेंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, भोसरी जमीन खरेदी प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एफआयआर दाखल करून चौकशीचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची तयारी राज्य सरकारने दाखवली होती. त्यावर चौकशी करा, मात्र अगोदर गुन्हा नोंदवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली.

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करत एमआयडीसीच्या मालकीची ४० कोटी किमतीची  ३ एकर जमीन ३ कोटी ७५ लाखांत खरेदी केल्याचा आरोप आहे. खडसेंविरुद्ध कारवाईस विलंब का लागतो आहे, असे न्यायालयाने विचारल्यावर पुणे पोलिसांनी तपास केला आहे. चौकशी एसीबीकडे देण्याची तयारी असल्याचे सरकारने सांगितले.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...