आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकड जनावरे घ्यायला सरकार तयार, शेतकऱ्यांना पैसे देऊ - खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोवंश हत्या बंदीमुळे भाकड जनावरांचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असेल तर, सरकार ती जनावरे सांभाळायला तयार आहे, असे धाडसी विधान राज्याचे महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खडसे यांनी सरकार जनावरे सांभाळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याचा सवाल एकनाथ खडसेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मी शेतकरी आहे, मला तसे चित्र कुठे दिसलेले नाही असे सांगून थेट उत्तर देण्याचे टाळले. मात्र जेव्हा पत्रकारांनी त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी, शेतकऱ्यांना आजारी आणि भाकड जनावरे सांभाळणे अवघड जात असेल तर सरकार त्यांची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे विधान केले. शेतकऱ्यांनी जनावरे आमच्याकडे आणून द्यावी आणि पैसे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्याच बरोबर राज्यातील बहुसंख्य लोकांच्या हिताचे निर्णय सरकार घेणारच असेही त्यांनी ठासून सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना विचारात न घेता घेण्यात आलेला गोवंश हत्या बंदी कायदा मागे घेण्यात येण्याची शक्यता कमी आहे.