आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंनी नियमावर बोट ठेवून केली सरकारची कोंडी, पृथ्वीराज चव्हाणांनी केला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नियमावर बोट ठेवून फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. खडसे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरुन फडणवीस सरकारला खिंडीत गाठले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाचा अधिकार विरोधकांचा असल्याचे सांगून खडसेंनी सरकारला अडचणीत टाकले आहे. तर सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अंतिम आठवडा प्रस्ताव ठरवण्याचा अधिकार हा विरोधकांचा आहे. जर विषय जास्त असतील तर अध्यक्ष विरोधकांना विषय कमी करण्याची विनंती करतील, मात्र अंतिम आठवडा प्रस्तावातील बदल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी संगनमताने करायचे असतात, असे एकनाथ खडसे म्हणाले.

खडसेंनी सरकारला दिलेल्या आहेराचे विरोधकांनी स्वागत..
खडसेंनी दिलेल्या सरकारच्या आहेराचे विरोधकांनी स्वागत केले. सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. कोणते मुद्दे चर्चेला घ्यावे हे आम्ही ठरवणार, सरकार यातून मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

प्रकाश मेहता यांची चौकशी आणि विश्वास पाटील यांची चौकशी कधी होणार? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. भ्रष्ट मंत्री आणि अधिकार्‍यांची चौकशी निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली व्हायला हवी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले ही तर लोकशाहीची हत्या...
अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा अधिकार असतो. या प्रस्तावावर चर्चा करायची नाही म्हणून आमचे प्रस्ताव रद्द केले. आमचे अधिकार मारले गेले, ही लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया  जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...