आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाला माझा ‘छगन भुजबळ’ करावा वाटत असेल, त्यांनी खुशाल मनोरंजन करावे -खडसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माझ्याविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र मी स्थितप्रज्ञ असून प्रत्येक चौकशीला हसतखेळत सामोरा गेलाेय. माझा ‘छगन भुजबळ’ करावा असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी खुशाल मनोरंजन करावे, असा टोला भाजपचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया यांना पत्रकार परिषदेत लगावला आहे. 
   

‘गेली ४० वर्षे मी राजकारणात असून माझा कुठलाही उद्योग नाही.माझी एकही खासगी कंपनी तर नाही, शैक्षणिक संस्थाही नाहीत. मंत्रिपदावर असतानाही मला असे उद्योग करावे असे कधी वाटले नाही. मी अाधुनिक शेतकरी असून बागायती शेतीमधून वर्षाकाठी २५ लाखांचे उत्पन्न मला मिळते. शेतीशिवाय माझे कुठलेही उत्पन्न  नाही. याउपर कोणाला शंका असेल तर त्यांनी खुशाल माझी निवडणूक आयोग तसेच आयकर विभागाकडे तक्रार करावी. मी सर्व प्रकारच्या चौकशांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. माझ्यात अाणि भुजबळ यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे’, अशा शब्दात खडसेंनी दमानिया यांना सुनावले. अजित पवार व सुनील तटकरे यांच्या विरोधात हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून न्यायालयात धाव घेणाऱ्या दमानिया यांनी अचानक याचिकेतून माघार का घेतली? नुसते आरोप करायचे अाणि गप्प बसायचे. राधेश्याम मोपलवार यांचे प्रकरणही उघडकीस आले, त्यावेळी हे कथिक समाजसेवक गप्प का होते? दरवेळी फक्त मलाच टार्गेट का केले जाते? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.  
 
 
माझ्यावर यापूर्वीही असंख्य आरोप झाले. मात्र चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. माझ्या एनआरआय जावयाने मोठी कार घेतली. त्यावरुन झालेल्या गहजबातूनही  काहीच निष्पन्न झाले नाही. आमचे सरकार संवेदनशील असून, सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये यासाठी आरोपांची चौकशी होते. भोसरीतील जमीन खरेदीवरून आरोप झाले. पण या जमिनीच्या सातबाऱ्यावर अजूनही मूळ मालकाचे नाव आहे. जमिनीचा ताबा माझ्या जावयाला मिळाला नाही, असा दावाही खडसेंनी केला.
 

जमीन सरकारजमा केल्याने आरोप
खडसे म्हणाले, ‘माझा कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. मी कुठेही अश्लील बोललेलो नाही, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असून दमानिया यांची जमीन सरकारजमा केल्याने त्यांनी सूडबुद्धीने अाणि केवळ प्रसिद्धीसाठी हे आरोप केले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...