आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे दिल्लीत: आडवाणी, गडकरी, रामलाल यांची घेतली भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भूखंड घोटाळ्यासह विविध आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले एकनाथ खडसे गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. खडसे दिल्लीत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. खडसेंनी काल रात्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली तसेच ती पक्षापर्यंत जावी अशी विनंती गडकरींना केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी 5 देशाचा दौरा आटपून आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. मोदींच्या पीएमओने खडसेंसाठी आजच्या दिवसातील अर्धा तास वेळ राखीव ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी खडसेंनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, संघटनमंत्री रामलाल यांची भेट घेऊन आरोप निर्दोष असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...