आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eknath Shinde Choosen As Legislature Party Of Shivsena

फूट टाळण्यासाठीच शिंदेंना गटनेतेपद, ठाण्याचा गड अधिक बळकट करण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप सरकारला बहुमतासाठी केवळ दहा आमदार कमी आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वाने कितीही अात्मसन्मानाची भाषा केली तरी सत्तेच्या माेहापायी शिवसेनेतून एखादा गट भाजपकडे खेचला जाऊ शकताे, या भीतीपाेटीच उद्धव ठाकरेंनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे सांगितले जाते.

शिंदे उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचे सांगितले जात हाेते. त्यामुळे इतर कुणाला गटनेता म्हणून निवडले असते, तर शिंदे अापला दहा-बारा आमदारांचा गट घेऊन भाजपात जाऊ शकतात, अशी भीती बाेलली जात हाेती.

शिवसेनेचे एकेकाळचे लाेकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या अकाली मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा ठाणे बालेकिल्ला तितक्याच अाक्रमकपणे सांभाळला अाहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतून पक्ष हद्दपार होत असतानाही ठाण्यात गड मात्र त्यांनी ढासळू दिला नव्हता. त्यामुळे शिंदेंचे पक्षात माेठे स्थान हाेते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांना महत्त्वाच्या निर्णयात डावलले जात असल्याची शिंदे समर्थकांची तक्रार हाेती. अाघाडी सरकारच्या कार्यकाळातच शिंदे अापल्या समर्थकांसह पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा हाेती. परंतु त्यांना अाघाडी सरकारमध्ये हवे ते खाते मिळू न शकल्याने त्यांनी तूर्त शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला हाेता, असेही बाेलले जात अाहे.

बालेकिल्ले गमावण्याची भीती
शिंदे बंडखाेरीच्या मानसिकतेत असल्याची पक्षप्रमुखांनाही कल्पना अाहे. ते पक्षातून गेले तर ठाणे- कल्याण या बालेकिल्ल्यात शिवसेनेला भगदाड पडू शकते. तसेच अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली अाणि ठाणे महापालिकेतील शिवसेनेची सत्ताही संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे काहीही करुन एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षातून केले जात होते.