आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eknath Shinde In Leader Of Opposition In Maharashtra Assembly

विराेधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे, विधानसभा भंग करा, भारिपची हायकाेर्टात याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंधराव्या विधानसभेत दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची बुधवारी विधानसभा अध्यक्षांनी विराेधी पक्षनेतेपदी निवड केली. शिवसेनेचे नेते रामदास कदम, उपनेत्या नीलम गाेऱ्हे यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांनी त्यांचे पुष्पगु्च्छ देऊन अभिनंदन केले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या बिनविराेध निवडीनंतर विराेधी पक्षनेतेपदाची निवड हाेणे अपेक्षित असताना ते टाळून अध्यक्षांनी थेट विश्वास प्रस्ताव मांडण्यास मंजूरी दिली. त्यामुळे विधानसभेत एकच गाेंधळ झाला. या गाेंधळातच अध्यक्षांनी विश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले व पाठाेपाठ शिंदे यांची निवडही जाहीर केली. शिंदे यांनी पहिल्याच दिवशी आक्रमक विराेधी पक्ष म्हणून आपल्या कामाची चुणूक सरकारला दाखवून दिली. सभागृहात सरकारला धारेवर धरण्याबराेबरच सभागृहाबाहेरही त्यांनी राज्यपालांची गाडी अडवली.
विधानसभा भंग करा, हायकाेर्टात याचिका, ‘भारिप’ची मागणी
महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ ८ नाेव्हेंबर २०१४ रोजी संपणार होता. त्यामुळे नवे सरकार त्यादिवशी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात यायला हवे होते. परंतु, निवडणुकांचे निकाल लागूनही नवी विधानसभा निर्धारित वेळेत अिस्तत्वात न आल्यामुळे आता राज्यात स्थापन झालेले नवे सरकार घटनाबाह्य ठरत आहे. त्यामुळे सध्या बेकायदा अस्तित्वात असलेली पंधरावी विधानसभा राज्यपालांनी भंग करावी, अशा मागणीची याचिका भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
फडणवीस सरकारमधील सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगून कलम ३५६ प्रमाणे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असेही या याचिकेत म्हटले आहे. भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय सचिव जयराम पवार यांनी ही याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती व्ही.एम.कानडे आणि अनुजा प्रभूदेसाई यांचे पीठ गुरूवारी त्यावर सुनावणी करतील.