आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवा; राज्य निवडणूक आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत प्रलोभनाच्या स्वरूपातील वस्तू, पैसे मद्याच्या वाटपाला प्रतिबंध करावा. त्याचबरोबर बँका आयकर विभागाच्या मदतीने रोख रकमांच्या मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवावे. तसेच निवडणुकीतील गैरप्रकार प्रकार टाळण्यासाठी सोशल मीडियावरदेखील बारकाईने नजर ठेवावी’, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले अाहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता, मुंबईचे पोलिस आयुक्त डी. डी. पडसलगीकर, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त आदींसह आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क, विक्रीकर विभाग राज्यस्तरीय बँकर्स समितीचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वताेपरी खबरदारी घ्यायला हवी. कुख्यात गुन्हेगारांची यादी करणे, अवैध शस्त्रे जमा करणे, भरारी पथके नियुक्ती करणे, नाका तपासणी करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. लोकसभा विधानसभा निवडणुकांप्रमाणे सर्व काळजी घ्यावी. क्षेत्रीय यंत्रणेने आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. पेड न्यूजबाबत दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरील अफवा अथवा अनुचित स्वरूपातील मजकुरावरही बारकाईने लक्ष ठेवावे त्याला वेळीच आळा घालावा. बँका आयकर विभागाच्या मदतीने रोख रकमांच्या व्यवहाराव लक्ष ठेवतानाच बसस्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ आदी ठिकाणी सतर्कता बाळगावी,’ अशा सूचना सहारिया यांनी केल्या.

मुख्य सचिव म्हणाले, ‘मुक्त, निर्भय पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्याची आपल्या राज्याची परंपरा कायम राखण्यासाठी न्यायालयांचे विविध निर्देश, कायद्यातील तरतुदी आणि आयोगाच्या आदेशांप्रमाणे संपूर्ण यंत्रणेने कार्यवाही करावी.’
बातम्या आणखी आहेत...