आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Announced The Deadline To End General Of The Panchayats Program

ग्रामपंचायतींमध्‍ये निवडणुकीच्‍या रणधुमाळीला सुरुवात; 25 जुलै व 4 ऑगस्टला मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 1 हजार 779 सार्वत्रिक व 632 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 25 जुलै 2015 रोजी मतदान होईल. दुस-या टप्प्यात 23 जिल्ह्यातील सात हजार 19 सार्वत्रिक व 1 हजार 212 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम :
निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक- 25 जून 2015
नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 4 ते 10 जुलै 2015
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 13 जुलै 2015
नामनिर्देशनपत्रे मागे घेणे व चिन्ह वाटप- 15 जुलै 2015
मतदान- 25 जुलै 2015
मतमोजणी- 27 जुलै 2015
दुस-या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम :
निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक- 4 जुलै 2015
नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे- 13 ते 20 जुलै 2015
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 21 जुलै 2015
नामनिर्देशनपत्रे मागे घेणे व चिन्ह वाटप- 23 जुलै 2015
मतदान- 4 ऑगस्ट 2015
मतमोजणी- 6 ऑगस्ट 2015
जिल्‍हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या :
सांगली- 97 (9), कोल्हापूर- 416 (57), बीड- 92 (28), नांदेड- 281 (2), लातूर- 8 (66), अमरावती- 18 (93), यवतमाळ- 502 (124), वर्धा- 31 (42), भंडारा- 148 (14), गोंदिया- 182 (7) आणि गडचिरोली- 4 (190). एकूण-1779 (632).
दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या (कंसात रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे- 1 (91), पालघर- 2 (0), रायगड- 24 (91), सिंधुदूर्ग- 0 (62), रत्नागिरी- 1 (188), नाशिक- 11 (202), धुळे- 220 (0), अहमदनगर- 749 (92), नंदूरबार- 26 (29), जळगाव- 776 (32), पुणे- 704 (196), सोलापूर- 128 (18), सातारा- 711 (15), औरंगाबाद- 588 (39), परभणी- 524 (4), उस्मानाबाद- 422 (12), जालना- 0 (24), हिंगोली- 467 (0), अकोला- 220 (49), वाशीम- 163 (0), बुलढाणा- 521 (25), नागपूर- 129 (0) आणि चंद्रपूर- 632 (43). एकूण- 7019 (1212)