आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री महादेव जानकरांवर निवडणूक आयोगाचा ठपका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत एका उमेदवाराचा राजकीय पक्षाचा उमेदवारी अर्ज नामंजूर करून त्याला विशिष्ट चिन्ह देण्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यास दूरध्वनीवरून केलेल्या सूचना बेकायदशीर व गुन्हेगारी कृत्य ठरते, असा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला. त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला असल्याचा ठपकाही आयोगाने जानकरांवर ठेवला आहे. आयोगाने हा अहवाल जाहीर केल्यानंतर आता एकनाथ खडसेंनंतर जानकरांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय सरकारला आपली सुटका करवून घेणे अशक्य होईल, असे संकेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...