आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक आयोगाच्या गाेंधळाने निकालाची अाकडेवारी गुलदस्त्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचे अधिकार असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या ढिसाळपणामुळे १६४ नगर परिषदा व पंचायतींच्या निवडणुकीचा नेमका निकाल काय आहे? याबद्दल साेमवारी रात्री उशिरापर्यंत गाेंधळ कायम हाेता. या गोंधळाचा लाभ घेत सर्वच पक्ष आपली कामगिरी उत्तम असल्याचे चित्र निर्माण करत हाेते. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग देशाच्या लोकसभेच्या निकालाची ताजी माहिती क्षणोक्षणी देत असताना राज्य निवडणूक अायोग मात्र मतमोजणी सुरू झाल्यानंतर तब्बल २४ तासानंतरही अधिकृत अाकडेवारी देण्यात अपयशी ठरले अाहे.

राज्य निवडणूक आयुक्त व राज्याचे माजी मुख्य सचिव ज.स. सहारिया यांनी नगर पालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरून घेण्याची घोषणा करत अापण हायटेक असल्याची प्रचिती दिली. मात्र निवडणुकीचा निकाल मात्र अाॅनलाईन जाहीर करण्यात ते अपयशी ठरले. एवढेच नव्हे तर मतमोजणीचा कुठेही मागमूस अायाेगाच्या संकेतस्थळावर नव्हता.
बातम्या आणखी आहेत...