आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने रोखली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेना नेते व काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्यात जोरदार वादविवाद झाला. मतदानाच्या अगोदर एक दिवस राणेंनी पत्रकारांशी बोलणे हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली होती. त्यानुसार राणे पत्रकारांशी बोलत असताना निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांना पत्रकार परिषद घेण्यापासून रोखले.

राणेंच्या या कथित पत्रकार परिषदेविरोधात शिवसेनेचे खासदार व पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन तक्रार केली होती. राणेंचे हे कृत्य म्हणजे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘माझा वाढदिवस असल्याने पत्रकारांना भेटण्यासाठी बोलावले होते,’ असे स्पष्टीकरण राणेंनी शिवसेनेच्या आरोपावर दिले आहे. तसेच ‘माझी पत्रकार परिषद रोखताना निवडणूक आयोगाने मला जे काही पत्र दिले आहे त्यात कोणत्याही नियमाचा उल्लेख नाही. मला पत्रकार परिषद घेण्यावाचून रोखणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे,’ असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

शिवसेना घाबरली : पराभव समोर दिसू लागल्याने शिवसेना मला घाबरली. शिवसेनेने आता ‘आक्रमक’ हा शब्द वापरू नये. त्यांच्यातील आक्रमकता कधीच संपली आहे. त्यांच्या एकाही नेत्याकडे अभ्यास नाही. अनिल देसाई हे कारकून आहेत, अशी टीकाही राणेंनी केली.