आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Drama: Congress Not Agree On 26 22 Seats Formula

निवडणुकीचे पडघम: 26-22 चा जागावाटप फॉर्म्युला कॉंग्रेसला अमान्य, 'बिघाडी'ची चिन्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा तिढा कायम असून 26 आणि 22 चा जागावाटप फॉर्म्युला अमान्य असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले. यामुळे आघाडीत पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोल्याची जागा सोडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दोन दिवसीय नवी दिल्ली भेटीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, संरक्षण मंत्री ए.के. अँटनी, रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली.
हातमिळवणीची रणनीती
जागावाटपासोबतच संभाव्य राजकीय आघाडीच्या मुद्द्यावरही भेटीत चर्चा झाली. भारिप-बमसंशी आघाडी करून प्रकाश आंबेडकरांसाठी अकोल्याची जागा सोडली जाईल. कोणत्या पक्षांशी आघाडी करायची यावर निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या अँटनी समितीशीही काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासमवेत उभय नेत्यांनी चर्चा केली. ठाणे जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीसोबतची युती कायम करण्यावरही एकमत झाले.
दबावाचे डावपेच तरीही 16 जागा
राष्ट्रवादीला 22 जागा हव्या असल्या तरी काँग्रेसला ते मान्य नाही. काँग्रेस 32 तर राष्ट्रवादी 16 यावर काँग्रेस आग्रही आहे, असे एका नेत्याने सांगितले. यामुळे नरेंद्र मोदी यांना कोर्टाने क्लीन चिट दिल्याचे सांगून दबाव वाढविण्याच्या राष्ट्रवादीच्या डावपेचांना भाव देण्यास काँग्रेस तयार नसल्याचेही दिसत आहे.
...तर लगेच जागावाटप : ठाकरे
राष्ट्रवादीने आज रात्री म्हटले तरी जागावाटप करून घेऊ, असे सांगून माणिकराव म्हणाले की, काही खासदारांचा पत्ता कापण्याबाबत चर्चा आहे. परंतु, गेल्या वेळी जेथे हरलो, त्याच जागांवर चर्चा केली. विद्यमान खासदारांबाबत अजून व्हायची आहे.