आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदानाला गालबाेट : अमळनेरात अामदार चौधरींच्या मारहाणीत माजी सभापती बेशुद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर ( जि. जळगाव) - अमळनेर नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी अपक्ष अामदार शिरीष चाैधरींनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल भाईदास पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर पाटील समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत वाहनांचे नुकसान झाले, अामदारांच्या बंगल्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी पाेलिसांनी केलेल्या लाठीमारात एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी अार. के. नगरात घडली.

रविवारी मतदान सुरू असताना किरकाेळ कारणावरून अामदार शिरीष चाैधरी व अनिल भाईदास पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अामदार चाैधरींनी पाटील यांना ताेंडावर, छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली त्यामुळे ते बेशुद्ध झाले. साेबतच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने शहरातील खासगी दवाखान्यात हलवले. डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पाटील यांना सीटी स्कॅन करण्यासाठी बेशुद्धावस्थेतच धुळे येथे हलवले. या घटनेची माहिती गावात मिळताच पाटील यांच्या समर्थकांनी दगडफेक सुुरू केली. त्यांनी नंदुरबार पासिंगच्या पाच चारचाकी, चार दुचाकींची माेडताेड केली. कचेरी राेडवरील अामदार चाैधरींच्या मालकीची इमारत, मंगलमूर्ती पतसंस्थेजवळील अामदारांच्या संपर्क कार्यालयावर तुफान दगडफेक केली. त्यामुळे धास्तावलेल्या अामदारांच्या कुटुंबीयांनी धुळे राेडवरील कल्याण पाटील या कार्यकर्त्याच्या घरात अाश्रय घेतला. परंतु तेथेही पाटील समर्थकांनी दगडफेक केली. ढेकू राेडवरील अामदार चाैधरींच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या वाहनाच्या काचा फाेडण्यात अाल्या. ठिकठिकाणी घाेळक्याने जमा झालेला शेकडाेंचा जमाव पांगवण्यासाठी पाेलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. ललिता पाटील यांचा मुलगा पराग पाटील हा जखमी झाला. माजी अामदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी जमाव थांबून हाेता. त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे अावाहन केले.

पाेलिस अधीक्षक तळ ठाेकून
तणावाची माहिती मिळताच जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी गावात येऊन चाेख बंदाेबस्ताच्या सूचना दिल्या. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत अार. के. नगर, धुळे राेड परिसरात पळापळ झाली. नंतर मात्र मतदान केंद्रांवरील प्रक्रिया सुरळीत पार पडली. अामदार चाैधरींचे ढेकू राेडवरील निवासस्थान, अार. के. नगर, माजी अामदार साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानीही अधीक्षकांनी भेट देऊन माहिती घेतली.

कराडमध्ये भाजप नेत्याची महिला पाेलिसाशी दांडगाई
सातारा जिल्ह्यातील अाठ नगर परिषदा व सहा नगर पंचायतींसाठी रविवारी कराडमधील अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. कराडमध्ये भाजपच्या एका नेत्याने अरेरावी करत थेट मतदान केंद्रात गाडी घातली, तसेच त्यांना अडविणाऱ्या महिला पाेलिसालाही अरेरावीची भाषा वापरल्याची घटना घडली. भाजपचे नेते तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर एका मतदान केंद्रावर अाले. व अापली गाडी थेट केंद्राच्या हद्दीत नेली. त्यावेळी ड्युटीवर हजर असलेल्या एका महिला पाेलिसाने चरेगावकर यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या महिलेला अरेरावीची भाषा वापरली. ‘माझी गाडी मंत्रालयात काेणी अडवित नाही, तुम्ही काेण?’ असा सवाल त्यांनी केला तसेच काही अपशब्दही वापरल्याचा अाराेप संबंधित पाेलिसाने केला अाहे. मात्र महिला पाेलिसानेच मला शिवीगाळ केल्याचा चरेगावकरांचा अाराेप अाहे.
बातम्या आणखी आहेत...