आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election For Speaker Of Maharashtra Assembly Today

अध्यक्षपद निवडणुकीत लागणार कस, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच होणार तिरंगी निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - विधान भवनात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांच्याशी ‘हस्तांदोलन’ केले. अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादीचे शिवसेनेशीही ‘हातमिळवणी’चे तर हे संकेत नाहीत ना? शेजारी भाजपचे गिरीश बापट.
मुंबई - राज्य विधानसभेत बुधवारी काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष असताना भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विश्वासमताला सामोरे जाण्याआधी होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकच सरकारची अग्निपरीक्षा ठरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असून, विधानसभेत मतपेटी ठेवून गुप्त मतदान घेतले जाईल. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे विजय औटी व काँग्रेसच्या वर्षा गायकवाड रिंगणात आहेत.

तिरंगी लढत असल्याने सभागृहात दोनदा मतदान घेण्याची वेळ येऊ शकते. तिसऱ्या उमेदवाराने माघार न घेतल्यास विशेष व गुप्त मतदान प्रक्रिया राबवली जाईल. सभागृहात मतपेटी ठेवली जाईल. सर्व आमदारांना मतपत्रिका दिल्या जातील. ही प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे हे पार पाडतील. त्यांना मदतीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे प्रत्येकी दोन आणि अन्य दोन असे चार सदस्य राहतील.

इतिहासात प्रथमच तिरंगी लढत
राज्याच्या इतिहासात प्रथमच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बागडे अध्यक्ष झाल्यास हा मान मिळवणारे मराठवाड्याचे ते दुसरे ठरतील. या आधी १९७८ ते ८० या काळात शिवराज पाटील अध्यक्ष होते.
इतिहासात दुस-यांदा अध्यक्षपदासाठी किचकट मतदान प्रक्रिया
अध्यक्षाची निवड एकमताने करण्याची पद्धत असली तरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर दुस-यांदा या पदासाठी किचकट मतदान प्रक्रिया होणार आहे. याआधी १९९९मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले होते. तेव्हा या पदासाठी निवडणूक झाली होती. राष्ट्रवादीने पदावर दावा सांगत बाबासाहेब कुपेकर यांची निवड केली होती. भाजपचे गिरीश बापट विरोधात उभे होते,
मतदानात ते पराभूत झाले होते.
फडणवीसांचा ठाकरेंना फोन
शिवसेनेची मंगळवारी दुपारपर्यंत फरपट करणा-या भाजपने रात्री उशीरा संवादाचे पाऊल टाकले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून अध्यक्षपद निवडणुकीत उमेदवार देऊ नका, अशी विनंती केली. तेव्हा उद्धव यांनी बुधवारी सकाळी ९ वाजता यावर निर्णय सांगतो अशी भूमिका घेतली, अशी सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेसची राष्ट्रवादीशी चर्चा
काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर गटनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, आमच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेऊन मदतीसाठी विनंती केली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंशीही चर्चा सुरू आहे. बुधवारी सकाळी निर्णय देण्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांची मते मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे.
अशी असेल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया
मतदान प्रक्रियेपूर्वी अर्ज मागे घेण्यासाठी सकाळी १० पर्यंत वेळ आहे. तोवर कुणीही अर्ज मागे न घेतल्यास तीन उमेदवार स्पर्धेत राहतील.
एकाने माघार घेतल्यास : एका उमेदवाराने वेळेत माघार घेतली व दोन उमेदवार रिंगणात उरले तर ज्याला जास्त मते पडतील तो अध्यक्ष जाहीर होईल.
तिन्ही उमेदवार रिंगणात
बागडे, औटी आणि गायकवाड असे तिन्ही उमेदवार रिंगणात राहिल्यास निवडणूक प्रक्रिया काहीशी किचकट स्वरूपाची होईल. त्याचे गणित असे असेल...
समजा पुढीलप्रमाणे मते मिळाली तर...
दोघांच्या बेरजेपेक्षा जास्त मते, मग पहिला विजयी....
- बागडे १२२
- औटी ६३
- गायकवाड ४१
व राष्ट्रवादी तटस्थ....
इतर दोघांच्या मतांची बेरीज पहिल्याच्या मतांपेक्षा कमी असेल तर पहिला विजयी ठरेल. म्हणजे वर्षा गायकवाड आणि औटी यांच्या मतांची बेरीज होईल १०४ , पण बागडेंना १२२ पडलेली असतील. म्हणजे बागडे विजयी जाहीर होतील.
दोघांची बेरीज अधिक... मग दुसरी फेरी
- बागडे ११०
- औटी ८०
- गायकवाड ४०
इतर दोघांच्या मतांची बेरीज पहिल्याच्या मतांपेक्षा जास्त असेल. म्हणजेच गायकवाड व औटी यांच्या मतांची बेरीज १२० ही बागडेंच्या मतांपेक्षा मोठी ठरल्यास नियमानुसार तिस-या क्रमांकाचा उमेदवार आपोआप बाद होईल.

- पहिल्या दोन उमेदवारांसाठी पुन्हा मतदान घेतले जाईल. म्हणजेच मतदानाची दुसरी फेरी होईल. यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. त्यांची मते मिळवण्यासाठी शिवसेना व काँग्रेस दोघांचीही धडपड आहे.
२८६ आमदार सभागृहात
२८८ पैकी २८६ आमदारांनी शपथ घेतली. भाजपच्या गोविंद राठोड यांचे निधन झाले आहे. काँग्रेसचे सुरूपसिंग नाईक अँजिओप्लास्टी झाल्याने सुरतेत उपचार घेत आहेत.
पु़ढे वाचा, बुधवारी काय घडेल...