आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिनी विधानसभा : 164 नगराध्यक्षांसाठी आज 25 जिल्ह्यांत थेट मतदान!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या राजकीय वर्तुळात मिनी विधानसभा निवडणूक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या १४७ नगर परिषदा आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान होत असून नगरसेवकाच्या ३ हजार ७०५ व थेट नगराध्यक्षपदांच्या १४७ जांगासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २५ जिल्ह्यांत ही निवडणूक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतमोजणी सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी होईल. एकूण ५८ लाख ४९ हजार १७१ मतदार आहेत. पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांतील १४७ नगर परिषदा व १८ नगर पंचायतींसाठी मतदान होते. मात्र शिराळ्यातील बहिष्कारामुळे १७ च ठिकाणी मतदान होईल. नगर परिषदेच्या १४७ थेट नगराध्यक्षपदांसाठी १ हजार १३ उमेदवारांमध्ये लढत होईल.

मराठवाड्यातील ५ जिल्हे
जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, अंबड परतूर, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमतनगर, कळमनुरी, बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, परळी-वैजनाथ, अंबेजोगाई, गेवराई, धारूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, परांडा, भूम, कळंब, तुळजापूर, नळदुर्ग मुरूम उमरगा येथेही रविवारी मतदान होत आहे.
बातम्या आणखी आहेत...