आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी; आज बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी, मेळावे, दौर्‍याचे राज्यभर आयोजन करण्यासाठी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरामध्ये शनिवारी आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री, राज्य प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे नेते राज्यभरातील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांना मार्गदर्शन करतील. रखडलेल्या महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषयही चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरामध्ये राज्यांना काही कार्यक्रम देण्यात आले असून त्यामध्ये सर्व तालुका आणि जिल्ह्यांमध्ये मेळावे, संघटना बांधणी, प्रवक्ता-वक्त्यांची शिबिरे आदींचा समावेश आहे. हा कार्यक्रम 12 फेब्रुवारीपासून सुरू करायचा असून एप्रिल महिन्यापर्यंतच्या कामाचा आढावा केंद्रीय समितीकडे पाठवायचा आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता आतापासूनच पक्षाने त्याची तयारी सुरू केली आहे. जयपूर शिबिरातील विविध मुद्दय़ांची अंमलबजावणी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे.