आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Teacher, Chief Election Officer, Divya Marathi

पेपर तपासणार्‍या शिक्षकांची निवडणूक कामातून सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पेपर्स तपासण्याचे काम करणार्‍या राज्यातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामांतून सूट देण्याचा निर्णय मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी घेतला आहे. निकालास विलंब होऊ म्हणून शिक्षण विभागाने याबाबत निवडणूक आयोगाला विनंती केली होती. ती मान्य करण्यात आली.


दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल 45 दिवसांत जाहीर करावयाचे असतात. त्यामुळे या पेपर तपासणीमध्ये सहभागी असलेल्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आमदार रामनाथ मोते यांनी केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने तशी विनंती मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना केली होती. या शिक्षकांच्या बदल्यात पर्यायी शिक्षक देण्याची तयारी शिक्षण विभागाने दाखवली आहे.


बदली शिक्षक हवा
10 वी आणि 12 वी परीक्षांचे पेपर तपासण्याठी नेमणूक करण्यात आल्याचे ज्या शिक्षकांकडे बोर्डाचे पत्र आहे त्यांनाच निवडणूक कामांतून सूट देण्यात यावी. परंतु सूट देण्यापूर्वी बदली शिक्षक उपलब्ध झालेला हवा. बदली शिक्षक उपलब्ध नसेल तर सूट देण्यात येऊ नये, तसे आदेश सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी गुरुवारी पाठवलेले आहेत.