आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडी, पनवेल, मालेगाव पालिकेसाठी अाज मतदान, शुक्रवारी जाहीर हाेणार निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिकांसाठी बुधवारी (ता. २४) मतदान हाेणार अाहे. तसेच  धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूकही हाेत अाहे. त्यासाठी  संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. शुक्रवारी (ता. २६) या सर्व ठिकाणची मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेणार अाहे.  या सर्व पालिकांसाठी सकाळी ७.३०  ते ५.३० या वेळेत मतदान होईल.   
 
भिवंडी, मालेगाव व पनवेल या तीन महापालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार २६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात २२९१ कंट्राेल युनिट, ७१४३ बॅलेट युनिटचा समावेश आहे.   
 
नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगर परिषदेचे अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीही बुधवारीच मतदान होईल. चारही ठिकाणी प्रत्येकी १७ जागा आहेत. एकूण ६८ जागांसाठी २७६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...