आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Robbery Issue At Mumbai, Ganesh Festival

उत्सवात वीज चोरी रोखण्यासाठी विशेष पथके नेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गणेशोत्सव,नवरात्र आणि उत्सव काळात होणारी वीज चोरी रोखण्यासाठी विशेष पथके नेमा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिले. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, राज्यात मोठ्या प्रमाणात विजेचे संकट आहे. अनेक भागात पंधरा तास भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे उत्सव काळात होणारी वीज चोरी रोखण्याची गरज आहे.

वीज चोरी रोखणाऱ्या पथकामध्ये पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकार असेल. तसेच यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अलीकडेच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना अशी समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मारिया यांनी संबंधित कंपन्यांशी बोलणी करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.