आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२७ फेब्रुवारीला वीज ग्राहक करणार बिलांची होळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारने १ डिसेंबर २०१४ पासून अनुदान बंद केल्याने राज्यातील ३०० युनिटच्या आतील सर्व वीज ग्राहक तसेच औद्योगिक ग्राहक यांच्या वीज बिलांमध्ये २० ते २२ टक्के वाढ झाल्यामुळे सध्या सर्वांना भरमसाठ बिले येत आहेत. याशिवाय आणखी १२ टक्के वाढीसाठी महावितरणने वीज नियामक आयोगासमोर याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात वीज ग्राहक व औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीने वाढत्या वीज
बिलांची होळी करण्याचा निर्णय घेतला. २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता राज्याच्या प्रत्येक भागात घरगुती ग्राहक, उद्योजक तसेच यंत्रमागधारक हजारोंच्या संख्येने जमा होऊन वीज बिलांची होळी करणार आहेत.

२७ हॉसपॉवरच्या आतील यंत्रमागधारक ग्राहकांच्या बिलात २४ टक्के, तर त्यावरील ग्राहकांच्या बिलात ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आज सत्तेवर असलेल्या युती सरकारचे मंत्री तसेच आमदारांनी आंदोलन केले होते. युती सरकारने हिवाळी अधिवेशनात अनुदान जानेवारी २०१५ पर्यंत सुरू ठेवू व रास्त दर निर्धारित करू, असे आश्वासन दिले होते. पण, अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.