आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Electricity Line Go Underground In Aurangabad : State Minister Of Power

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादमधील वीज वाहिनी भूमिगत होणार : ऊर्जा राज्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औरंगाबाद शहरातील सिडको-सेंट्रल जकात नाका ते रोशन गेट ही 33 के.व्ही.ची विद्युत वीज वाहिनी भूमिगत पद्धतीने टाकण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळूक यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. आमदार एम. एम. शेख यांनी त्याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.

रस्त्याच्या रुंदीकरणामुळे या वीज वाहिनीमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर 33 के. व्ही. विद्युत दाबाची वीज वाहिनी भूमिगत करणे शासनाच्या विचाराधीन आहे. त्याबाबत जिल्हा नियोजन योजने (डीपीडीसी) मधून निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच सदर वीज वाहिनी भूमिगत पद्धतीने टाकण्यात येईल, असे राजेंद्र मुळूक म्हणाले.