आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Rate Double In State Compare Other State

आता वीज पेटणार : उद्योजकांचा 'अजित पवार हटाव'चा नारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत दीडपट वीज महाग असल्याने राज्यातील उद्योजक, यंत्रमागधारक व शेतकरी त्रस्त आहेत. त्यांच्या मागण्यांची व आंदोलनाची दखल कोणीही घेत नसल्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या विरोधात चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या 10 डिसेंबरपासून अजित पवार जिथे-जिथे जातील तेथे वीजदरवाढीचा व अजित पवारांनी घेतलेल्या धोरणांचा निषेध करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या विरोधात एक वातावरण तयार होत असताना आता उद्योजकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राज्यात वीज ग्राहकांच्या व महाराष्ट्राच्या हिताची कोणतेही भूमिका न घेणारे व विकासास मारक ठरत व भ्रष्टाचारास अभय देत असल्याच्या विरोधात 10 डिसेंबरला सकाळी 11 वाजता उद्योजक कामगारांसह राज्यभर सर्वत्र चक्काजाम करणार आहेत. तसेच ऊर्जामंत्री जेथे जातील तेथे काळ्या फिती लावून निदर्शने करतील. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज दरवाढ दीडपट जास्त का, याबद्दल ऊर्जामंत्री स्पष्टीकरण का देत नाहीत. महानिर्मिती कंपनीची अकार्यक्षमता व भ्रष्टाचार मोठा आहे.
आणखी पुढे वाचा....