आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेंगराचेंगरी घातपात; तपास एनआयएकडे सोपवण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एलफिन्सटन दुर्घटना म्हणजे घातपात असून या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे. या प्रकरणी 5 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. फैजल बनारसवाला यांनी ही याचिका हायकोर्टात  दाखल केली आहे. पीडितांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती गवई यांच्याकडे ही याचिका सादर करण्यात आली. याचिकेवर 5 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तसेच यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला आहे.

 

एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीआधी पत्रा कोसळल्याच्या, शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा उठल्या होत्या. परंतु अफवा उठल्याचा कोणताही उल्लेख या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांच्या जबाबात आढळला नाही. त्यामुळे या दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

या दुर्घटनेचा तपास एनआयएकडे सोपवून यामागे दहशतवादी कृत्य आहे का याचा तपास करावा, अशी मागणी करण्यात आली. तसंच चेंगराचेंगरीतील जखमींना नुकसान भरपाई म्हणून योग्य तो मोबदला देण्याचीही मागणी याचिकार्त्यांनी केली आहे.

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...