आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या घटका मोजत होती ही तरूणी, मदतीच्या नावाखाली तरूणाने केले अश्लील कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शहरातील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 23 लोकांचा मृत्यू झाला. या दरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात या गर्दीत व चेंगराचेंगरीत एक तरूणी तुडवली जात असताना शेवटच्या घटका मोजत होती तर, तेथे घटनास्थळी उपस्थित एक व्यक्ती तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करताना दिसताना दिसला. काय आहे व्हिडिओत....
 
- 8 सेकंदाच्या या व्हिडिओत चेंगराचेंगरी पुलावर लोक बेशुद्ध स्थितीत पडलेले दिसत आहेत. लोकांच्या रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येत आहेत.
- पुलावर लोक एक दुस-यांना तुडवत व चेंगराचेंगरी करत पुढे जाताना दिसत आहेत. तर,अशा स्थितीत एक तरूणी पुलावर अडकलेली दिसत आहे.
- याचदरम्यान तेथे उभा असलेला एक व्यक्ती तरूणीला वाचविण्याचे नाटक करत तिच्यासोबत अश्लील हरकत करताना दिसत आहे.
- पीडित तरूणीसोबत जेव्हा हे कृत्य केले जात होते तेव्हा ती शेवटच्या घटका मोजत होती. यानंतर काही मिनिटांतच त्या तरूणीने प्राण सोडला.
- आता हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या आधारावर पोलिस आता अश्लील हरकत करणा-या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
- एलफिन्स्टन रोड निवासी संदेश बहादुर यांनी सांगितले की, "छेडछाडीचा हा व्हिडिओ लाज आणणारा आहे आणि तो व्यक्ती कोण आहे माहित नसतानाही त्याला शिक्षा करावी असे मानत येतेय. आम्ही मदतीला पळालो, महिला मदतीसाठी ओरडत होत्या. पण पुलावर एवढी गर्दी होती की आम्ही काहीच करू शकत नव्हतो."
- रेल्वे पोलिस कमिश्नर निकेत कौशिक यांनी सांगितले की, हे प्रकरण आता मुंबई पोलिसांकडे सुपूर्त केले गेले आहे. मात्र, आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू."
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेतील व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...