आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employ ability In Afflicted By Suicide Zone At Mumbai

आत्महत्याग्रस्त भागातील तरुणांना मुंबईत राेजगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मेट्रो तीन व कोस्टल रोड या मुंबईत होऊ घातलेल्या हजारो कोटींच्या प्रकल्पांत दुष्काळग्रस्तांबरोबर शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांना कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. समाजापासून दूरावत चाललेल्या या वर्गाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी राज्य सरकारचा हा प्रयत्न अाहे. या याेजनेचा प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील युवकांना लाभ हाेणार अाहे.

नगर विकास राज्यमंत्री डाॅ. रणजीत पाटील यांनी ही माहिती दिली. रोजगाराच्या माध्यमातून या भागातील युवकांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचा एक प्रयत्न सरकार करणार असून या योजनेसाठी आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागात मेळावे घेऊन याची कल्पनाही देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

मुंबईत पायूभूत सुविधांच्या दृष्टीने कोस्टल रोड आणि मेट्रो ३ हे प्रकल्प महत्वाचे मानले जातात या प्रकल्पांचे काम सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यातुन अनेक कुशल कामगारांची गरज लागणार आहे. अशा वेळी दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त गावातील तरूणांना ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

काैशल्याचे प्रशिक्षणही
दुष्काळी व अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा भाग म्हणून मराठवाडा व विदर्भ अाेळखला जाताे. या भागातले तरूण रोजगाराच्या शोधात आहेत. यापैकी अनेक तरूण अशिक्षित आहेत. सरकार या तरूणांना या नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्य शिकवेल तसेच त्यांना नोकऱ्या देण्यासाठी संबंधित कंपन्यांवरही बंधन लादण्याची शक्यता आहे. अन्य विभागही एकत्रित करून त्यांचेही गरजे नुसार आणि तरूणांच्या आवडीनूसार त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.

या कार्यक्रमासाठी ९०० ते १००० कोटींचा निधी उभा करण्याची तयारीही राज्य सरकारने केली आहे. यामधून या भागातील जास्तीत जास्त तरूणांना कमीत कमी १५ हजारापर्यंतची नोकरी मिळू शकेल.

मराठवाडा, विदर्भ व राज्याच्या इतर भागातून कामासाठी येणाऱ्या या तरूणांच्या मुंबईत राहण्याचा प्रश्न असला तरी त्यावर ही लवकरच तोडगा काढला जाईल. शिवाय या तरूणांनी आता नैराश्येतून बाहेर पडले पाहिजे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही सरकारीची राहील. यातून त्यांच्यात आलेले नैराश्य नक्की दुर होईल, असे डाॅ. पाटील म्हणाले.

मराठवाडा- विदर्भासाठी फायदेशीर याेजना
युवकांच्या कल्याणासाठी सरकार विविध योजना राबवत असते. मात्र अशा योजनांमध्ये या योजनांचे विकेंद्रीकरण झाले असल्याने त्याचा नीटसा फायदा होत नाही. ग्रामविकास विभागाने जलयुक्त शिवार योजना राबवत अशाच जलसंधारण तसेच अन्य भागातील पाणी अडवण्याच्या तसेच जिरवण्याच्या योजना आणून एकच जलयुक्त शिवार योजना राबवली आहे. त्याच धर्तीवर ही याेजना असणार आहे. मराठवाडा व विदर्भातील युवकांना ती फायदेशीर ठरणार अाहे.