आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नतीची संधी नसलेल्या कर्मचार्‍यांना सुधारित वेतनश्रेणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पदोन्नतीची संधी नसलेल्या म्हणजेच कर्मचार्‍यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी अंदाजे 9 कोटी रुपये वार्षिक खर्च अपेक्षित आहे.

12 वर्षे नियमित सेवेनंतरही पदोन्नती न मिळाल्यास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत त्याला पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी लागू केली जाते. या योजनेत दुसरा लाभ पहिल्या लाभानंतर 12 वर्षांच्या सेवेनंतर लागू केला जातो. मात्र, काही पदे एकाकी असल्याने अशा पदांना विशिष्ट वरिष्ठ वेतन संरचना 12 आणि 24 वर्षांनी लागू केली आहे. 12 वर्षांच्या सेवेनंतर ग्रेड वेतन 2000 पर्यंत असणार्‍यांना विद्यमान पे बँडशी संलग्न ग्रेड वेतन अधिक 300 रुपये वेतन दिले जाईल, तर 2001 ते 4000 रुपये ग्रेड वेतन असलेल्यांना 400 रुपये, 4001 ते 5000 रुपये ग्रेड वेतन असलेल्यांना 500 रुपये, 5001 ते 5400 रुपयांपर्यंत ग्रेड वेतन असलेल्यांना 600 रुपये सुधारित ग्रेड वेतन दिले जाईल.

पहिल्या लाभाच्या प्राप्तीच्या दिनांकापासून 12 वर्षांच्या नियमित सेवेनंतर ग्रेड वेतन 2000 पर्यंत असणार्‍यांना विद्यमान पे बँडशी संलग्न ग्रेड वेतन अधिक 400 रुपये वेतन दिले जाईल. तर 2001 ते 4000 रुपये ग्रेड वेतन असलेल्यांना 550 रुपये, 4001 ते 5000 रुपये ग्रेड वेतन असलेल्यांना 700 रुपये, 5001 ते 5400 रुपयांपर्यंत ग्रेड वेतन असलेल्यांना 800 रुपये ग्रेड वेतन दिले जाईल.