आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encorage BPO Companies In Small Towns Ravishankar Prasad

लहान शहरांत बीपीओ कंपन्यांना देणार सवलती - माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लहान शहरांत बीपीओ स्थापन करण्याच्या दृष्टीने कंपन्यांना सवलती देण्याचा सरकारचा विचार आहे. त्याचे धोरण ठरण्यात येत असल्याची माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. लहान शहरांत बीपीओ स्थापण्याच्या दृष्टीने योग्य धोरण राबवण्याची गरज असल्याचे प्रसाद यांनी ‘ग्लोबल बिझनेस समिट’मध्ये बोलताना स्पष्ट केले.

गुडगाव, पुणे, हैदराबाद, चेन्नई, विजयवाडा, बंगळुरू, म्हैसूर यांसारख्या काही मर्यादित शहरांमध्ये बीपीओचे अस्तित्व दिसून येत असून देशभरात छोट्या शहरांत हा विस्तार झाला तर विकासाशी संबंधित कार्ये सुरू होतील. यासाठी वीज आणि सवलतींच्या तरतुदींसाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. आगामी तीन वर्षांत अडीच लाख पंचायतींना नेटवर्कद्वारे जोडण्याचा सरकारचा विचार असून त्यामुळे व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण होतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

स्मार्ट शहरांची निवड स्पर्धेच्या आधारे करणार
नवी दिल्ली |देशात शंभर स्मार्ट सिटी व ५०० इतर शहरे नियोजनबद्धरीत्या विकसित करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या स्मार्ट शहरांची निवड स्पर्धात्मक प्रक्रियेतून केली जाणार आहे, अशी माहिती शहर विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी दिली. स्मार्ट शहरांच निवडीसाठी निकष लावले जाणार असून ते ठरवण्याचे काम सुरू आहे, असे नायडू म्हणाले.
निकष पूर्ण करणारी शहरेच स्मार्ट सिटीजसाठी निवडली जातील, असे नायडू यांनी स्पष्ट केले.