आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमक फेम पीएसआय दया नायक निलंबित, बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास टाळाटाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नागपूर येथे बदली झाल्यानंतरही रुजू होण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिस दलातील चकमक फेम पोलिस अधिकारी दया नायक यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून तसा आदेश जारी झाला असून या निलंबनाविरोधात नायक यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. नुकत्याच मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले असून दया नायक यांचीही नागपूर येथे बदली करण्यात आली होती.
२४ जून रोजी बदलीचा आदेश प्राप्त झाल्यानंतरही आपल्या जिवाला धोका असल्याचे कारण देत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास नायक यांनी नकार दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस महासंचालक कार्यालयाने नायक यांचे निलंबन केल्याचा आदेश जारी केला आहे.
आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत नायक यांनी विविध गुन्हेगारी टोळ्यांमधील ५६ कुख्यात गुंडांना ठार मारले होते. मात्र, गुन्हेगारी जगताशी संबंध आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर २००६ मध्ये पहिल्यांदा निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या विरोधात न्यायालयीन लढाईत २०१२ मध्ये त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलिस दलात सामावून घेण्यात आले होते.