आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

113 एन्काउंटर करणारे प्रदीप शर्मा पुन्हा पोलिस दलात परतणार, 2008मध्‍ये झाले होते बडतर्फ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मा पुन्हा पोलिस सेवेत परतले आहेत. छोटा राजनचा हस्तक असलेल्या लखनभैया चकमक प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्यानंतर त्यांचा पोलिस दलात परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तब्बल ११३ एन्काउंटर नावावर असलेल्या प्रदीप शर्मा यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपावरून २००८ मध्ये पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.    
 
मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सध्या शर्मा हे पोलिस महासंचालक कार्यालयात रुजू झाले आहेत. लवकरच त्यांना मुंबई किंवा ठाण्यात पाठवले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शर्मा हे १९८३ सालच्या उपनिरीक्षक तुकडीचे अधिकारी असून आपल्या बडतर्फीविरोधात त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅटकडे धाव घेतली होती. त्यावर २००९ साली मॅटने शर्मांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र, मॅटच्या या निर्णयाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्यावर निकाल येण्यापूर्वीच २००६ साली झालेल्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना अटक झाली होती.
बातम्या आणखी आहेत...