आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एन्काउंटरफेम माजी पोलिस अधिकारी अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवी मुंबईतील विकासक सुनीलकुमार लाहोरिया यांच्या हत्येप्रकरणी पोलीसांनी माजी पोलीस अधिकारी ‘एन्काउंटरफेम’ सॅम्युअल अमोलिक याच्यासह चौघांना अटक केली आहे. मात्र, या खुनाची सुपारी कुणी दिली होती हे स्पष्ट झालेले नाही. अमोलिकने 40 गुंडांचा एन्काऊंटर केला असून त्याला राष्‍ट्रपतिपदकही मिळालेले आहे.

विकासक सुनीलकुमार लाहोरिया यांची हत्या त्यांच्या कार्यालयासमोर फिल्मी स्टाईलने झाली होती. हल्लेखोरांनी सुनीलकुमार गाडीतून उतरताच त्यांच्यावर गोळया झाडल्या. तसेच चॉपरनेही वार केले होते. हल्ला झालेल्या ठिकाणीच मनु शेट्टी या हल्लेखोराला लोकांनी पकडून दिले होते. तर रविवारी सकाळी माजी पोलिस अधिकारी सॅम्युअल अमोलिक याला अटक करण्यात आली. अमोलिक 2011 मध्ये निवृत्त झाला होता. त्यापूर्वी सेवेत असताना तो एका विकासकाचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. तर 2010 साली मुंब्रा येथे झालेल्या एका बनावट एन्काउंटर प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले होते. त्याचे कुख्यात दाऊदशी संबंध असल्याचेही बोलले जाते. या प्रकरणी पोलिसांनी वाजिद कुरेशीसह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील विकासक सुरेश बिजलानी यांनीच खुनाची सुपारी दिली असल्याचा आरोप सुनीलकुमार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अनेक बड्या बिल्डर्सची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.