मुंबई- ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ अशी ओेळख असलेले बहुचर्चित पोलिस उपनिरीक्षक दया नायक यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. लवकरच त्यांना नियुक्ती दिली जाईल. पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विदर्भात (नागपूर) बदली झाल्यानंतर ते त्या ठिकाणी रुजू न होता दीर्घ आजारी रजेवर निघून गेले होते. त्यामुळे तत्कालीन डीआयजी संजीव दयाळ यांनी जूनमध्ये नायक यांना निलंबित केले होते. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी 2006 मध्येही ते निलंबित झाले होते. मात्र, सुप्रीम कोर्टात आरोप न सिद्ध झाल्यामुळे 2012 मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.
या कारणावरून दया नायकांवर झाली होती निलंबनाची कारवाई:- बेहिशेबी मालमत्ताव अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून दया नायक यांना 2006 मध्ये निलंबित करण्यात आले होते.
- एसीबीने चौकशी केली परंतु दया नायकांवरील एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
- नायक यांची नागपूरला बदली झाली होती. मात्र, त्या ठिकाणी रुजू न होता ते दीर्घ आजारी रजेवर निघून गेले होते.
- अद्याप आपल्याला ऑर्डर मिळाली नसल्याचे नायकांनी म्हटले आहे. मात्र, उत्तर- पश्चिम विभागात त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आतापर्यंत 80 एन्काउंटरदया नायक यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त एन्काउंटर केले आहेत.
दया यांच्यावर बनले चित्रपट
चित्रपट निर्माता शमित अमिन यांचा 'अब तक छप्पन' आणि एन. चंद्रा यांनी 'कगार' हे चित्रपट दया यांच्या जिवनावर बनवण्यात आले आहेत. तर, 2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'डिपार्टमेंट' हा चित्रपटसुध्दा दया यांच्याच जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात संजय दत्तने दया नायकची भूमिका वठवली होती. बॉलिवूडमध्ये माझे अनेक मित्र आहेत असे दया यांनी सांगितले आहे.
अनेक निर्मात्यांनी त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवले आहेत. जेव्हा केव्हा कोणताही चित्रपट नि्र्माता दया यांना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारतो, तेव्हा दया त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व घटनांबद्दल सांगतात. अनेक वेळा तर चित्रपटात दयाचे पात्र कसे दाखवावे याबद्दलही दया सल्ले देत असतात. तेलगू आणि कन्नड भाषामध्येही दया यांच्या जीवनावर चित्रपट बनले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायकांचे निवडक फोटोज...