आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे पोलिस अधिकारी मुंबईतील एन्‍काउंटर स्पेशालिस्ट, प्रदीप शर्माने केलेत 112 एन्काऊंटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्‍काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी आतापर्यंत 112 जणांना ठार मारले आहे. - Divya Marathi
एन्‍काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी आतापर्यंत 112 जणांना ठार मारले आहे.
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात त्याला अटक केल्यापासून 16 दिवसात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका बिल्डरला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बालविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता इक्बालविरोधात खंडणीच्या तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 18 सप्टेंबर रोजी एका खंडणी प्रकरणात कासकर आणि त्याच्या साथीदारांना अटक करत चकमकफेम (एन्‍काउंटर स्पेशालिस्ट) अधिकारी प्रदीप शर्मांनी मोठा 'मासा' गळाला लावून आपले 'कमबॅक' जोरदार केले होते. विविध आरोपांमुळे नऊ वर्षे निलंबित केलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शर्मा नुकतेच पुन्हा पोलिस दलात रुजू झाले आहेत. शर्मांनी थेट दाऊदच्या भावालाच हात घातल्याने सध्या शर्मा यांच्या नावाची दहशत अंडरवर्ल्डमध्ये सुरु झाली आहे. काय संकल्पना आहे एन्‍काउंटर स्पेशालिस्ट?....
 
- 1980-90 च्‍या दशकात मुंबईमध्‍ये अंडरवर्ल्डची प्रचंड दहशत होती. भर रस्‍त्‍यात टोळीयुद्ध होत होते. त्‍यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍थवेर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले.
- मग मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्‍यासाठी आपल्‍या काही अधिकाऱ्यांवर छोटा राजन, दाऊद आणि इतर डॉनच्‍या गँगला संपवण्‍याची जबाबदारी सोपवली. 
- दरम्‍यान, पोलिसांनी काही गँगस्‍टरच्‍या विरुद्ध नोटिसा बजावून 'शूट एट साईट'चा आदेश दिले आणि त्‍यानंतर मुंबईत सुरू झाली एन्‍काउंटर्सची मालिका. 
- या काळात जळपास 450 से पेक्षाही अधिक गँगस्टर्सचे एन्‍काउंटर केल्याचे सांगितले जाते. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अंडरवर्ल्डचे नेटवर्क मोडून काढण्याचे आव्हान स्वीकारले होते.
- यात मुंडेंना मोठे यशही आले. मात्र, काही पोलिस अधिका-यांवर खोटे एन्‍काउंटर केल्‍याचा आरोप झाला. काही पोलिस अधिका-यांवर गॅंगस्टरच्या आदेशाने विरोधी गॅंगस्टरच्या खोट्या चकमकी घडवून मारल्याचे आरोप झाले.
- दाऊदच्या भावाला अटक करणारे प्रदीप शर्मा यांच्यावरही दाऊदच्या आदेशावरून छोटा राजन व अरूण गवळींच्या गुंडांना खोट्या एन्काऊंटरमध्ये मारल्याचा आरोप झाला आहे.
- अर्थातच असे आरोप केवळ प्रदीप शर्मावरच नव्हे तर मुंबई पोलिस दलातील अनेक पोलिस अधिका-यांवर झाले आहेत.

या आज वृत्तात आपण कोणत्या कोणत्या पोलिस अधिका-यांवर खोट्या एन्काऊंटर केल्याचे आरोप झालेत यावर प्रकाशझोत टाकूया...
 
नाव- प्रदीप शर्मा
 
एन्‍काउंटर- 112
 
आरोप - छोटा राजन गँगचा डॉन लखन भैया याचे खोटे एन्‍काउंटर केले असा आरोप यांच्‍यावर होता. पण, न्‍यायालयातून त्‍यांना क्लीन चिट मिळाली.
- एवढेच नाही तर मुंबईचे बिल्डर जनार्दन भांगे यांच्‍याकडून पैसे घेऊन छोटा राजनला संपण्‍याचा डाव रचल्‍याचा आरोपही त्‍यांच्‍यावर ठेवल्‍या गेला. परंतु, यातूनही त्‍यांची निर्दोष मुक्‍तता झाली.
- दरम्‍यान, त्‍यांना 9 वर्षे निलंबित करण्‍यात आले होते. 9 वर्षानंतर त्यांची निर्दोष सुटका होताच पोलिस दलात रूजू झाले आहेत.
- प्रदीप शर्मांनी आल्या आल्याच दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरसारखा मोठा 'मासा' गळाला लावून आपले 'कमबॅक' जोरदार केले आहे. 
- दाऊदसाठी काम करतो हे माझ्यावर झालेले आरोप पुसण्यासाठीच इक्बाल कासकरला अटक केल्याचे प्रदीप शर्माचे म्हणणे आहे.
 
पुढील स्लाइड्सवर जाणू घ्‍या,इतर एन्‍काउंटर स्पेशलिस्टच्‍या बाबतीत....
बातम्या आणखी आहेत...