आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंगणवाडीसेवीकांचा संप अखेर मिटला : अाता ज्येष्ठतेनुसार मिळणार मानधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र
मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर शुक्रवारी २६ दिवसांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. सेविका अाणि मदतनीसांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असून पुढील आर्थिक वर्षापासून अाणखी ५ % मानधनवाढ दिली जाणार आहे. 

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा १५०० रुपयांची (वार्षिक ३११ कोटी रुपयांची) मानधनवाढ दिली हाेती. मात्र ती मान्य नसल्याने संघटनांनी संप सुरूच ठेवला हाेता. अाता सेवाज्येष्ठतेनुसार मानधन तत्त्वामुळे सरकावर वार्षिक ४० कोटींचा  अतिरिक्त बोजा पडेल. दरम्यान, अांदाेलन काळात कर्मचाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली अाहे.
 
दिवाळी गाेड झाली
राज्य सरकारने ३५१ कोटींची मानधनवाढ दिली. आमची मागणी ११०० कोटींची होती. सेवाज्येष्ठतेनुसार मानधन, ५ टक्के मानधनवाढ मिळाल्याने यंदाची दिवाळी गोड झाली, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या नेत्या शुभा शमीम यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...