आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियंत्याला फेसबुकवरून तरुणीशी झालेली मैत्री पडली महागात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘फेसबुक’वरून अनेक तरुण महिला, तरुणी व मुलींशी मैत्री करण्याचा प्रयत्न करताना आढळून येतात. मात्र, ठाण्याच्या एका 45 वर्षीय अभियंत्याला फेसबुकवरून तरुणीशी झालेली मैत्री तब्बल सव्वा तीन लाखांत पडली.

या तरुणीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने एका अभियंत्याचे घर फोडून तीन लाख 16 हजार रुपये लांबवल्याचे उघडकीस आले आहे. गौरी शेट्टी, सोहेल शेख आणि साहिल सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिलीपकुमार जैस्वाल यांनी तिघांविरोधात तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी जैस्वाल यांची गौरी हिच्याशी फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर दोघेही अनेकदा चॅटिंग करत असे. 31 जुलै रोजी जैस्वाल यांनी तरुणीला आपल्या हिरानंदानी परिसरातील फ्लॅटवर बोलावून घेतले. त्यानंतर तिने त्यांच्याकडे मदत म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावर जैस्वाल यांनी तिला आठ हजार रुपये देऊ केले.

याच वेळी अचानक सोहेल व साहिल त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसले. त्यानंतर तिघांनी मिळून घरातील रोख रक्कम व दागिने असा तीन लाख 19 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. घटनेनंतर जैस्वाल यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तिघांना मालाड येथील एका मॉलमधून अटक करण्यात आली.