आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineer Founded Vagitable And Fruits Dray Divoce At Aurangabad

रोजगाराची संधी: अभियंत्याने शोधले जागतिक दर्जाचे उपकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाज्या, फळांची वाळवण करून साठवणूक करणारा अभिनव प्रयाेग अाैरंगाबाद जिल्ह्यातील अाठ गावांमध्ये राबवला जात अाहे. अन्न सुरक्षेबराेबरच राेजगाराची संधी देणारा प्रयाेग यशस्वी हाेत अाहे. यापुढे राज्य व देशभरात त्याची अंमलबजावणी करून सामाजिक, अार्थिक अामूलाग्र बदल घडविता येऊ शकताे. िबल गेट्स फाउंडेशन, यूएसएअायडी, बायरॅक, सायन्स फाॅर टेक्नाॅलाॅजी या संस्थांच्या पुढाकाराने हा प्रयाेग केला जात अाहे.

बीड िजल्ह्यातील अंबाजाेगाई येथील वैभव ितडके या केमिकल इंजिअर तरुणाने ‘साेलर कंडक्शन डायर’ उपकरण विकसित केले. आपल्याकडे उन्हाचे प्रमाण मुबलक असल्याने कमीत कमी ऊर्जेचा वापर करून अन्न प्रक्रिया चांगली कशी करता येईल हा मूळ उद्देश यामागे अाहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी'मध्ये वैभव पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू असतानाच त्याने 'सोलार फूड प्रोसेसिंग ऑफ अॅग्रो प्रॉडक्ट्स' या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. २००७ मध्ये 'युनेस्को'तर्फे निवडण्यात आलेल्या अव्वल दहा इंजिनिअरिंग इनोव्हेशन्समध्ये या प्रकल्पाची निवड झाली. त्यासाठी मोठ्या रकमेचं बक्षीसंही मिळालं. तेव्हापासून वैभवने या प्रोजेक्टमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं. अापले तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सन २००८ मध्ये सायन्स फॉर सोसायटीची स्थापना केली.

महाराष्ट्रात दरवर्षी साधारण २३ कोटी टन फळ आणि भाज्याचं उत्पादन होतं. पण साठवणुकीची साेय नसल्याने यातील ३० टक्के शेतमालाची नासाडी होते. हे नुकसान टाळण्यासाठी हा प्रायाेगिक प्रकल्प अाैरंगाबादमधील अाठ गावांमध्ये दाेन वर्षांपासून राबवण्यात येत असल्याचे तिडके यांनी सांगितले.

नूपुर नागवेकर, स्वाती िशंपी या अामच्या स्वयंसेविका सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा करत अाहेत. अाैरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयाच्या डाॅ. प्रतिभा फाटक यांचे सहकार्य िमळाले अाहे. या प्रकल्पाला यश येऊन कृषी, अाराेग्य, महिला यांचे जीवनमान उंचावले तर हा संशाेधन अहवाल जगभरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे ितडके यांनी सांिगतले. ितडके यांच्या या वाळवणी यंत्राला मागणी असून अातापर्यंत देशातील २२ राज्ये तसेच श्रीलंका, केनिया, व्हिएतनाम, फ्रान्ससारख्या देशांपर्यंत ते पाेहोचले अाहे.

वाळवण यंत्र काम कसे करते ?
पाॅलिमरपासून बनवलेले हे यंत्र सहा िकलाे वजनाचे अाहे. या फायबरमुळे सूर्याच्या अतिनील िकरणांचा खाद्यपदार्थांवर काेणताही परिणाम हाेत नाही. यामध्ये एका वेळी दहा ते बारा किलो भाज्या वाळवल्या जाऊ शकतात, भाज्यांत ७० ते ८० टक्के पाणी असते. पण ड्रायरने भाजी वाळवून एक वर्षापर्यंत भाजी साठवता येते. सहा बाय सहा फूट अाकाराचे हे उपकरण फक्त सूर्यप्रकाश पोहोचेल, अशा ठिकाणी म्हणजेच छतावर, गच्चीत ठेवता येते. त्यासाठी फक्त ४० चाैरस फूट जागा लागते. हिरवी िमरची, कांदा, पालक, मेथी, लसूण, मूग, भाेपळा, दाेडका, काकडी, डाळिंब, अांबा यासह ४० प्रकारच्या भाज्या व फळे या वाळवण उपकरणात सुकवता येतात.

असा हाेणार फायदा
>हंगाम संपल्यावरही दुर्मिळ हाेणाऱ्या भाज्या, फळांचा अाहारात समावेश भाजीपाला वाळवून शेतकऱ्यांना विक्री तसेच स्वयंराेजगाराचा पर्याय.
>शंभर िकलाेचा कांदा वाळवल्यानंतर ताे दहापटीने कमी हाेताे. िपशवीत साठवून ठेवता येत असल्याने गाेदामाची गरज नाही.
>विजेशिवाय व साैर ऊर्जेवर हे उपकरण वापरता येत असल्याने खर्चातही मोठी बचत. देखभाल खर्चही कमी.
>ड्रायरमध्ये रोज १२ किलो म्हणजेच वर्षाला ३ टन भाजीपाला वाळवणे शक्य.
>प्रत्येक यंत्राची किंमत सात हजार रुपये.